आठवणीतील 'शाळा' :-2

आठवणीतील 'शाळा' :-2

Submitted by Cuty on 5 February, 2020 - 05:25

बालवाडी संपली अन एक नविन अध्याय सुरू झाला. ही होती प्राथमिक शाळा! त्याकाळी खेडोपाडी सहसा मुले जिल्हा परिषदेच्याच शाळेत जात. एकतर त्याचा दर्जाही चांगला असे अन त्याकाळी खाजगी शाळेचे एवढे पेव फुटले नव्हते. या शाळांची बांधणीही सर्वत्र एकसारखीच असे. मोठे उंच वर्ग, त्यांना प्रत्येकी चारपाच खिडक्या, दारापुढे मोठा प्रत्येक वर्गासमोरून जाणारा लांबलचक व-हांडा आणि त्याच्या दुसर्या बाजूला ओळीने लाकडी खांब. त्यावर तोलून धरलेला पत्रा आणि लाकडी तुळया. या लाकडी तुळयांवरसुद्धा रंग देऊन सुविचार किंवा पसायदानाच्या ओळी लिहिलेल्या असत.

Subscribe to RSS - आठवणीतील 'शाळा' :-2