बॅले डान्स रोहित पक्ष्यांचा

बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा

Submitted by Dr Raju Kasambe on 4 February, 2020 - 01:19

बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा

हजारो अग्निपंखांचे थवे गुलाबी
खाडीत कांदळवनाच्या उतरती
लावे वेध मिलनाचे, चाहूल मृगाची
ठेका धरतो ‘फ्लॅश मॉब’ नृत्याचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

लिपस्टिक आयशाडो
मिनिस्कर्ट स्टॉकिंग्ज
तयारी गुलाबी गुलाबी
करून मेकअप पूर्ण पार्टीचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

कॅटवॉक गुलाबी सुंदरींचा
नटून, खेटून चाले तुरुतुरु
जणू परेड नृत्यांगणांची
आभास नुसता खाण्याचा
बॅले डान्स, रोहित पक्ष्यांचा !

Subscribe to RSS - बॅले डान्स रोहित पक्ष्यांचा