राव पाटील!

परतीचा.

Submitted by अजिंक्यराव पाटील on 4 February, 2020 - 22:07

परतीचा पाऊस..

अरे पावसा, आलास पुन्हा? ये.. पण परतीचा असशील तरच हां..
काय घालायचाय तो धिंगाणा घाल, माझं छप्पर उडव, भिंती पाड, पार माझ्या आठवणींचं अस्तित्व सुद्धा गाडून टाक चिखलात.. पण परतीचा असशील तरच हां..

आधी आला होतास ना, तेव्हा माझ्या दारातुन वाहताना तुझ्या पाण्यात मी देखील माझी नाव सोडली होती, तुझ्या भरवश्यावर, मग तू थांबलास, डबकं झालं पाण्याचं अन नाव बुडाली.. आता पुन्हा नाव बनवणार नाही मी, प्रॉमिस.. पण परतीचा असशील तरच हां..

विषय: 
शब्दखुणा: 

कृपया धागा उडवावा

Submitted by अजिंक्यराव पाटील on 16 December, 2019 - 14:07

प्रेरणा: https://www.maayboli.com/node/72573

दिवसाच्या कोणत्याही वेळी,
उंटछाप बिडी पिताना,
न बोलावता अचानक येणारी,
कळ उठवणारी,
हागवण..

काहीतरी वजनदार उचलल्यावर,
कधी तरी अरबट चरबट खाल्ल्यावर,
हवेबरोबर (नकळत) वाहणारी,
कळ उठवणारी,
हागवण...

कुणाचं तरी भलं होताना पाहून,
धाग्यावरले चांगले प्रतीसाद पाहून,
नकळतपणे पोटात येणारी,
कळ उठवणारी,
हागवण..

शब्दखुणा: 

आपण..

Submitted by अजिंक्यराव पाटील on 19 November, 2019 - 12:35

धूसर क्षितिज, रोरावत्या लाटा,
जग सारं विसरून मागं,
स्तब्ध किनारा, गार वाळू,
तू आणि मी, आपण दोघं..

थांब ना थोडा, नको छळूस,
पाणी उडवत तुझं बोलणं,
गालावर लागलेली वाळू माझ्या
हलक्या हाताने टिपून घेणं..
नंतर तुझं खळी पाडून हसणं,
नवं प्रेम करतं जागं,
स्तब्ध किनारा, गार वाळू,
तू आणि मी आपण दोघं..

लालसर मावळतीची झाक,
पाण्यात जाते हळूच उतरत,
उतरणाऱ्या रंगासोबत,
वेळ सुद्धा येते सरत,
घड्याळांकडे पाहत पाहत,
परतू लागतात सारी लोकं,
मागे उरतात दोन सावल्या,
तू आणि मी, आपण दोघं..

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - राव पाटील!