मधु आणि चंद्र

मधु आणि चंद्र

Submitted by @गजानन बाठे on 13 October, 2019 - 02:24

मधु आणि चंद्र
ओशाळूनी का लपला शशि ?
खुदकन हसला मेघां आडूनी.
निशा सावळी सुरेख यौवन,
रक्तवर्णीली लाज वाटूनी.

कोजागिरी चा मुहूर्त ठरला,
प्रस्ताव धाडीला शरद चांदणी.
रूप गोजिरे रेखीव काया,
मिलनाशी आतुर सृजन यामिनी.

क्षिरस्नान यथोचित केले,
चंदन ,केसर,अत्तर लेपूनी.
माळूनी गजरा शुभ्र फुलांचा,
शृंगार साज ते उचित करुनी.

आकंठ मग ती प्रणय साधना,
शितल शशि अन रम्य रजनी.
दुग्ध शर्करा योग निरंतर,
मधुचंद्राची अमर कहाणी.

© गजानन बाठे

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मधु आणि चंद्र