बायको.............

नवरा............

Submitted by यतीन on 21 August, 2019 - 00:08

बायको.............

आहे हा एककल्ली राव चिडका।
काहीही निर्णय घेतो तडकफडका।।

रोजच्या नवनवीन मारतो गप्पा।
एकतरी गाठला का चांगला टप्पा।।

दिसणे साधे हासणे गालातल्या गालात।
नाही मिशा पिळायल, ताकद फक्त बातात।।

खाण्या पिण्यात नाही कसली आवड।
खरवड खाऊन म्हणतो किती गोड गोड।।

राजे म्हणतात स्वतःला या घरचे।
खरतर रिकामे आहे खोके वरचे।।

कवीता करता करता नाकीनऊ येतात।
फक्त यमंक जुळवून फुशारकी मारतात।।

दिसा गोड बोलतात, रात्रीत वेगळ्याच चालीत चालता।
चमचाभर घेता अण बाटलीभर रिझवली म्हणून सांगता।।

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बायको.............