सत्य कथन

वाट पाहते मरणाची

Submitted by यतीन on 17 August, 2019 - 02:41

मरणासाठी रजले की माझे मी सरण।
यमदूत थबकला बाघता माझे मरण।।

विस्तवाच्या दाह लागल्या माझ्या सरणा।।
श्वासास सांगितले थांबव जीवन यातना।।

माझी जीवनधारा बघता “निती” हि बिथरली।
सावली तर चार पाऊलेच मागे थबकली।।

विट विट बांधता संसाराची ऊभी केली भिंत।
मझल दरमझल केली न चुकता एकहि इंज।।

वाटेत काचखळ्यांनी केली माझी पुरती परवड।
परी म्यान असता तलवार केले सगळ्यांना बिमोड।

दमेल थकले मी अता करता संसार।
श्वासचा ही नाही पेलवत आता भार।।

अग्नीला नमन करते जवळ कर मजला।
हवेत विरून जाऊदे आता या देहाला।।

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सत्य कथन