मूल नसेलेल्या बापाची कवीता

मी एक अमूल

Submitted by यतीन on 16 August, 2019 - 08:31

*मी आहे एक अ-मूल*

पांजरपोळात हरवलेल्या पिलाला
बाप नावाच्या शोधात असलेला
असा एक मी अमूल.........

ऊसाच्या बोडंके असलेल्या शेतातला
पाण्या वाचून विव्हळणा-या मातीतला
बाप नावाच्या शोधात असलेला
असा एक मी अमूल.........

या परिक्षेत नाही कोण मला वाली
ओलावा असून पाने माझी सुकलेली

पाखरे पक्षी होऊन भुरकण उडाली
दाणे असून कूस माझी भुकेली

माझ्या मायेला नाही फुटला पान्हा
पण आसुसलेला आहे जीव तान्हा

रिते रिते राहीले माझे गोपाळ घर
पोरक झालय मन, असून छप्पर

Subscribe to RSS - मूल नसेलेल्या बापाची कवीता