माझ्या जीवनावर कवीता

सरलं ते आयुष्य

Submitted by यतीन on 16 August, 2019 - 08:23

सरलं ते आयुष्य उरल्या त्या आठवणी
अवघड वळणातील ही जीवन कहाणी।

निशब्द करून जाते मजला ह्या ठेवी
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।
कळी उमलताना हि कोमेजून गेली
फुले बहरताना वास विसरून गेली
फांदीला नाही कळले फुल कधी गळले
झाडही उन्मळून पडले न जिरता पाणी।
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

चिमुकल्या बोटांचा एक हात रिता झाला
वादळा च्या गर्गेत आजीने तो सावरला
दुडू दुडू धावू लागले पाया आली ताकद
बडबड गीते गाता होऊ लागली उजळणी
कहाणी उजळताना येते डोळ्यातून पाणी।।

Subscribe to RSS - माझ्या जीवनावर कवीता