तुम्हा निष्पापांचं असंच असतं

तुम्हा निष्पापांचं असंच असतं (चिमणी)

Submitted by Dr Raju Kasambe on 14 August, 2019 - 04:25

तुम्हा निष्पापांचं असंच असतं (चिमणी)

कसे तुम्ही मख्ख बाई
संसाराची कशी फिकीरच नाही

त्या दृष्ट काकाने पळविले छकुल्याला
तुम्हास कशी चिंता नाही

चिवचिव चिवचिव करशील किती
धावपळ ओरड करशील किती

बछडा तुझा गं मिळणार नाही
कारण काय तुला कळणार नाही

तुम्हा निष्पापांचं असंच असतं...
कसेही रहा, कुणी वाली नसतं

पहा ती चिऊताई धावून धावून
बसलीय शून्यात नजर लावून !

(१९९१)

Subscribe to RSS - तुम्हा निष्पापांचं असंच असतं