रातवा

रातवा

Submitted by Asu on 14 August, 2019 - 04:12

रातवा

पाऊस भीतीचा कोसळतो

रात्र अंधारी अशा एकांती
चिंब भिजून अंगा भिडतो
दुःख जगाचे नभी साठवून
रात्रंदिन का हा रडतो
पाऊस भीतीचा कोसळतो

वीज कडाडता घनी अंबरी
बिलगून तुझा उर धपापतो
सळसळ सळसळ पाने करुनि
भयसंगीत मनी छेडितो
पाऊस भीतीचा कोसळतो

मंद काजवा धुंद रातवा
पायी सरसर कुणी सरपटतो
भयकंपे काटा फुलुनि
अधिक बिलगण्या धडपडतो
पाऊस भीतीचा कोसळतो

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रातवा