मेंदीचा रंग

मेंदीचा रंग

Submitted by Asu on 13 August, 2019 - 09:20

मेंदीचा रंग

हळदीच्या अंगी चढे
मेंदीचा रंग
सजणाच्या रंगी मन
झाले ओलेचिंब
जळी-स्थळी नभी दिसे
कृष्ण सावळा
स्वर घुमतो आसमंती
गंध वेगळा
स्वप्न धुंद लोचनी
सजण साजरा
दिवस रात्र ध्यानीमनी
सखा हासरा
सतावतो लपून छपून
कृष्ण निलाजरा
नको तरी हवा वाटे
भाव बावरा
विरहात प्रणयाच्या
झाले निःसंग
आसुसले अंगी अंगी
भिजण्यास चिंब
येरे घना येरे घना
देई मज संग
पावसात भिजून दोघं
होऊ एक रंग

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मेंदीचा रंग