प्रगतीचा हव्यास

प्रगतीचा हव्यास

Submitted by Asu on 26 July, 2019 - 06:03

प्रगतीचा हव्यास

हव्यास प्रगतीचा नडतो
ग्लोबल वॉर्मिंग चहूकडे
हिमालये सागरास मिळती
प्रलयाचे घुमती बोल खडे

जमीन घटली नगरे वाढली
पाऊस पाणी जिरेल कुठे
घरादारात शिरते पाणी
प्रलयाचे घुमती बोल खडे

नद्या नाले तुडुंब भरले
पाणीच पाणी चोहीकडे
गुरेढोरे माणसे बुडाली
प्रलयाचे घुमती बोल खडे

माणसे मरती उजाड धरती
आकांडतांडव चोहीकडे
प्रगतीच्या हव्यासापोटी
प्रलयाचे घुमती बोल खडे

राज्याच्या हव्यासासाठी
कौरव-पांडव सैन्य लढले
कोण वाचले काय मिळाले
प्रलयाचे घुमती बोल खडे

Subscribe to RSS - प्रगतीचा हव्यास