Honey Bee poem

मधमाशीची झप्पी

Submitted by Dr Raju Kasambe on 21 July, 2019 - 08:00

मधमाशीची झप्पी

नाचे गुणगुणे ह्या मधमाशा
कळेना आम्हा त्यांची गूढ भाषा !

मारून भरार्‍या चहूदिशेला
झप्पी देई ती फुलाफुलाला !

भरून घेई परागकणांची झोळी
वाटा उचलते बांधण्यात पोळी !

थेंबा थेंबाने करते संचय मधाचा
शिकावा तिजकडून मंत्र बचतीचा !

परागणाचे करते अचाट काम
नकळत देई ती करोडोचा दाम !

हसती फुले मधमाशीच्या झप्पीने
मळे, फळबागा डुलती आनंदाने !

मधमाशांचे प्रमाण का घटले
कोडे शास्त्रज्ञांना नाही सुटले !

Subscribe to RSS - Honey Bee poem