सांग सांगते

सांग सांगते

Submitted by Asu on 6 June, 2019 - 22:53

सांग सांगते
(लेवा गणबोली)

सांग टोकराची हलकीफुलकी
वापऱ्याले लई आशे बहुगुनी
कुढीबी वापरा कशीबी वापरा
कोपऱ्यात बसते सुनी सुनी

वरती चढ्याले खाले उतऱ्याले
गच्ची पत्र्यावर आनं धाब्यावर
तुम्ही तंतर म्हना की यंतर म्हना
कमी शक्ति आनं काम भराभर

सांग सांगते तुले मानसा
चढ्याचं जर यश शिखर
कठीन येळी बिकट कायी
मार्ग नही तुले माह्या बिगर

जायाचं जर भरभर वरवर
माह्या बिगर नी खरा मैतर
सांग ईना ना तुही परगती
बोल आसु दे ध्यानी बरुबर

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सांग सांगते