आलास तू

आलास तू

Submitted by प्रांजलीप्रानम on 20 May, 2019 - 04:05

आलास तू
या शांत सरोवरात माझ्या
झंझावात होऊनी आलास तू

या ओसाड आयुष्यात माझ्या
वसंत म्हणूनी आलास तू

या सून्या मैफिलीत माझ्या
सूर बनूनी आलास तू

या विरक्त देहात माझ्या
भावना घेऊनी आलास तू

या अंधारलेल्या विश्वात माझ्या
ज्योत तेवूनी आलास तू

हे येणे तूझे,होतेच सुंदर
सुखद त्या स्वप्नापरि माझ्या

नकळे का वाटते, हे स्वप्न तूझे
जणू रूपचं दावूनी गेलास तू
असा आलास तू....
.....प्रांजली

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आलास तू