जात - पात

जात - पात

Submitted by Asu on 10 May, 2019 - 00:17

जात - पात

फूल म्हणाले धरतीला,
कां ग माते भेद केला ?
शुभ्र पांढरा मोगरा, बगळा
मी का मग निळा - सावळा ?

एकच ऊन आम्हा पोषते
एकच पाणी आम्हा तोषते
एकच माती, एकच नाती
कां मग ह्या वेगळ्या जाती ?

धरती म्हणाली एेक बाळा,
काळा गोरा, नसे वेगळा
राधा गोरी, कृष्ण काळा,
सिता उज्वल राम सावळा

शुभ्र सावळी, निर्मल काया
निसर्ग निर्मित केवळ माया
रंगांचे हे भेद मनोहर,
दोघांचेही अंतर सुंदर

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जात - पात