रहाटगाडे

रहाटगाडे

Submitted by Asu on 8 May, 2019 - 09:42

रहाटगाडे

जगणे मरणे गुंता
सोडविणे कशास चिंता
जे नाही आपुल्या हाती
मग कशास त्याची भिती

स्विकारती चालत राहणे
ठरतात ते जगी शहाणे
भेटेल जिथे मनःशांती
घ्यावी क्षणभर विश्रांती

रोज पुन्हा पायपीट
जरी येई चालण्या वीट
तरू छायेची भेटती
तसेच काटेरी, टोचती

नवी पालवी वसंताची
कधी गळती शिशिराची
उन्हापाठी सावली येई
रात्र मिटता पहाट होई

हा रहाट निसर्गाचा
फिरत सतत राही
पिऊन घोटभर पाणी
तू पुढेच चालत राही

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - रहाटगाडे