मला स्वप्नातच राहू दे.

स्वप्नातच आहे अजुनही,मला स्वप्नातच राहू दे.

Submitted by अजय चव्हाण on 28 April, 2019 - 11:18

सय तुझी, थोडी हुरहुर असू दे
बहरतील ना ही प्रेमफुले..
तोपर्यंत कळयांना कळयाचं राहू दे..

तु नसताना भासांत तु..
नभात विहरणारी पिसे तु..
येऊ नकोस इतक्यात..
भासांना माझ्या मऊ पिसे होऊ दे..

बिनरंगाचे सुरवंट हे..
स्वकोशात मश्गूल ते..
छेडू नकोस,थोडं थांब..
सुरवंटाचे रंगीत फुलपाखरू फुलु दे..

स्वाती नक्षत्र, ढगाळी सत्र..
ओल्या शिंपल्याला पाऊसाचं पत्र..
उघडून बघ अलगद तु..
मोत्यांसाठी एक थेंब वाहू दे..

विषय: 
Subscribe to RSS - मला स्वप्नातच राहू दे.