'सिद्धि'

पुडिंग- साधे सोपे आणि झटपट

Submitted by 'सिद्धि' on 18 July, 2019 - 08:20

साहित्य :-
गरम केलेले घट्ट दूध- पाउण लीटर
साखर - १/२ वाटी ( साधारण ८-१० टिस्पुन पुरे होते).
अंडी - ३ (पाव लिटर दुधासाठी १ अंड हे माझ प्रमाण आहे).
वेनिला एसेंस - १ टिस्पुन.
आवडत असेल तर केसर 2-3 काडी किंवा वेलची पावडर 1 चमचा.

1563435243418.jpgसजावट साहीत्य (ऐच्छिक) :-
काजू, बदाम, पिस्ते, स्ट्रॉबेरीस, काळ्या/ साध्या मनुका ई.

शब्दखुणा: 

अळूची पातळ भाजी/ फदफदं/ फतफत आणि एक कथा

Submitted by 'सिद्धि' on 24 June, 2019 - 08:36

अळूची पातळ भाजी/अळूच फदफदं/ फतफत :-

अळूची पातळ भाजी हे नाव बहुतेक सगळ्यांना माहीत आहे, मात्र अळु भाजीच्या बुळबुळीतपणा या गुणधर्मावरुन अळूचं फदफदं हे नाव ठेवल गेल आहे.
अळू भाजीची पाने ही थोडी पातळ आणि पोपटीसर रंगाची असतात.
IMG_20190624_103351.jpg

शब्दखुणा: 

मच्छी कढी (pomfret curry)

Submitted by 'सिद्धि' on 19 June, 2019 - 12:26

साहित्य:- माशांना( pomfret) मॅरिनेट करण्यासाठी.
माशाचे चार-पाच तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावेत. ४-५ कोकमाच्या तुकड्यांना भिजत घालून केलेला रस, मीठ अर्धा चमचा, पाव चमचा हळद, लाल तिखट अर्धा चमचा.
- माशांना कोकम, मीठ , तिखट, हळद लावुन १५ मिनिट फ्रिझ मध्ये ठेवा.
1560951449164.jpgओला मसाला-

शब्दखुणा: 

आयेगा आनेवाला...

Submitted by 'सिद्धि' on 13 June, 2019 - 07:07

टण....टण....मंदिरातील मोठ्याल्या घंटेला एकदाच टोला दिल्यावर घुमतो तो आवाज.
दुरदर्शन असाव तेव्हा. बाबा hall मध्ये t.v. बघत होते. मी बाजुलाच झोपलेले. मला अजुनही आठवतय. दोन टोले कानावर पडले तेव्हा मी तडक उठुनच बसले होते. घाबरून थोडं बाबांकडे सरकत माझा पहिलाच प्रश्न होता.
" बाबा हा एकटाच आहे ?
बाबांचं उत्तर होत: नाही दोघे आहेत. पण तो ही एकटाच आणि ती ही एकटीच!
मी: अस कस काय बाबा ? (मला म्हणायच होत या चित्रपटामध्ये अजुन कोण-कोण आहे.)
बाबांचं उत्तर: असच असत आयुष्यात. हा दुनियादारिचा गोतावळा फक्त नावालाच....बाकी आपण सगळे एकटेच येतो आणि एकटेच जातो."

शब्दखुणा: 

जमतच नाही कविता करणं

Submitted by 'सिद्धि' on 31 May, 2019 - 09:07

जमतच नाही कविता करणं
जस जमतच नाही आठवणी विसरण.

माते कडून पान्ह्याची
गुरु कडून ज्ञानाची
विधात्या कडून प्राणाची
अन विंदांच्या गाण्याची
अशी गुंफण केली दानाची
पण जमेनाच ते फेर धरन.

त्याच्या कडून चांगुलपणाची
तुझ्या कडून हळवेपणाची
तिच्या कडून सौंदर्याची
अन कृतज्ञतेच्या जाणिवांची
अशी गुंफण केली भावनांची
पण जमेनाच ते फेर धरन.

कल्पने कडून शब्दांची
स्मृतीं कडून भावनांची
तिमिरा कडून सरन्याची
अन उष:कालाच्या किरणांची
अशी गुंफण केली प्रारब्धाची
पण जमेनाच ते फेर धरन .

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

मोगरा

Submitted by 'सिद्धि' on 17 May, 2019 - 05:43

मोगरा...

नावातचं सुहास, शितलता आणि प्रसन्नता जाणवते.
फक्त मोगरा अस मनातचं म्हणा...कसा कोण जाणे त्याचा वास आजु-बाजुला जणवायला लागतो. (माझ्या बाबतीत तरी असच होत बर्याच वेळेस)
मन त्याच्या आठवणीच गुलाम आहे, नसताना ही त्याच अस्तित्व जाणवत. तो सुगंध मना-मनात भरलाय .

शब्दखुणा: 

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी - १

Submitted by 'सिद्धि' on 26 April, 2019 - 06:48

"कधी कधी वाटतं हॅरी पॉटरचा Time Turner फिरवावा आणि कालचक्रा सोबत फिरत मागे जाव त्या जमान्यात जो विस्मृतीत चाललाय."
पण ते शक्य नाही!
किती काही मागे सोडलेले आहे आपण ! आणि किती काही जोडलय ?

' ती खटारा गाडी आणि नदिवरील उडी,
तिखट मीठाची कैरी आणि आजीच्या गोष्टी ऐकण्यात जागलेल्या रात्री,
खळयातील लंगडी, लपाछपी आणि पकडा-पकडी,
शाळेत न जाण्यासाठी केलेले बहाने आणि आईकडून मार खाने,
भातुकलीचा खेळ आणि शुभंकरोती ची वेळ'.
सारं काही निसटून गेल, गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी.

विषय: 
शब्दखुणा: 

अंडा बिर्याणी- (उकडुन तुकडे केलेल्या अंडयाची बिर्याणी )

Submitted by 'सिद्धि' on 19 April, 2019 - 10:35

अख्या अंडयाची बिर्याणी आपण करतोच....ही थोडी वेगळी अंडयाचे तुकडे करून केलेली बिर्याणी आहे.
अख्ख अंड घालुन बिर्याणी होते पण तो अंडयाच flavor अजीबात येत नाही म्हणुन मी अशी बिर्याणी try केली....
एकदा तरी करून बघा....आवडेलच.

वाढणी/प्रमाण:
२-३

लागणारा वेळ:
३० मिनिटे

साहित्य

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - 'सिद्धि'