' आजकाल धावपळीच्या युगात दिवाळीचा फराळ घरी करणे म्हणजे फारच अवघड काम. बाजारात वेगवेगळ्या दरांमध्ये हेच पदार्थ सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे सध्या विकतचेच गोड मानुन दिवाळी साजरी करण्याचा ट्रेंड आहे . पुर्वी घरच्याघरीच ४-५ पदार्थ तरी सहज बनवले जायचे आणि एवढ करुन देखिल ' यंदा जास्त काही करता आल नाही हो.. ' अशी खंत मनात बाळगणार्या गृहीनी अश्या फराळाच्या रंगतदार गोष्टी चविचविने सांगत. आजकालच्या स्त्रिया घर आणि ऑफीस दोन्ही सांभाळताना तारेवरच्या कसरती प्रमाने जीवनाची कसरत करत जगतात, तर हे सगळे पदार्थ करण्यासाठी आपल्याकडे किती वेळ असणार म्हणा ....
(https://www.maayboli.com/node/71503 या मागील भागात आपण वाचले की, मजल-दरमजल करत आपण घरापर्यंत पोहोचलोय. गावच्या वेशीपासुन ते घराच्या दारापर्यंतचा प्रवास आपण वाचला. आणि त्याला भरभरुन प्रतिसादही दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. हाच प्रवास पुढे नेण्यापुर्वी मी या भागात माझ्या कोकणातील टुमदार जुन्या घराच्या काही निवडक आठवणी मांडत आहे. या भागामध्ये आपण या सगळ्या आठवणींना असाच उजाळा देत सैर करुया कोकणातील माझ्या घराची. खरतर कोकणातील घराची वर्णन खुप ठिकाणी वाचायला मिळतात.
" कमुला पाहील का हो तुम्ही ? माझी कमु हरवली आहे, कमु.... तुम्ही पाहील का तीला ?"
कोणीतरी माझा हात धरुन मला विचारत होते.
" च्याआयला मी तर स्वतःच हरवलोय. केव्हा पासून स्वत:चा पत्ता शोधतोय...पण सापडत नाही आहे. दुसर्यांना काय खाक शोधणार" - मी स्वत:शीच.
तरीही न रहावून मी मागे पाहीले, एक आजोबा माझा हात धरुन विचारत होते.
" माझ्या कमुला शोधायच आहे हो, आम्ही प्रभादेवीला जायला निघालो होतो. हाच प्लॅटफॉर्म ....खुप पाऊस आला आणि सगळीकडे गडबड झाली. गर्दीत चुकुन तीचा हात सुटला हो, आणि... आणि सगळीकडे गडबड झाली. तीला प्रवासाच काही समजत नाही. आता कुठे सापडत नाही ती."
कोकण म्हणजे ओल्या मतीचा गंध,
कोकण म्हणजे हळुवार मनाचा बंध,
कोकण म्हणजे कोवळी पहाट स्वच्छंद,
माझ्या मनातील कोकण म्हणजे... एक लहर बेधुंद ॥
अगं !
मी आणि माझा नवरा म्हणजे ना, अगदी मेतकूट.....
एकमेकांना न सांगताच, डोळ्यांची भाषा ओळखणारे. एकमेकांच्या प्रत्येक गोष्टीला, आमचा खंबीर सपोर्ट असतो.
आमचे नाते म्हणजे एक अतुट बंधन आहे हो. आणि माझे पती दिपक म्हणजे तर प्रेमाचा सागर.
आमच्या आई तर म्हणतात, "आम्ही दोघे म्हणजे, लक्ष्मी नारायणाचा जोडाच."
खरंतर तुला सांगते, 'एकमेकांचा मान-सन्मान ठेवला, की नातं आपोआप फुलत जात बघ.'
चल उद्या बोलू . आता आम्ही दोघे मुव्ही पाहण्यासाठी थोड बाहेर निघालो आहे.
बा...बाय डियर.
सेंड !
" कोणाला ही उशीर झाला की, हल्ली खुप धास्ती वाटत राहते. पण हाच थोडा उशीर हा, थोडा करता-करता थोडा जास्तच व्हायला लागला की वाटतं, एवढा उशीर पण होऊ नये, की आयुष्याची संध्याकाळ समोर येऊन ठेपलेली असेल.
जस नकार पचवण कठीण असतं, तसच उशीर पचवण थोडं कठीण झालं आहे हल्ली. तरीही मी खुप भाग्यवान आहे. कारण त्या एका संध्याकाळी भेटलेला तो, आयुष्याची संध्याकाळ येई पर्यंत वाट बघण्याच बळ देऊन गेला. आणि हे वाट बघणं कस सुसह्य होऊन गेलं. अशी मी नेहमीच त्याची वाट बघत बसते. कधी मनातचं, तर कधी प्रत्यक्षात. आणि मला ते आवडत ही."
साहित्य-
२ वाटी तांदळाचे पीठ (साधारण पाव किलो), 1 मोठया नारळाचा (संपूर्ण) चव/ किस, 1 वाटी गूळ(आवडी प्रमाणे कमी /जास्त घेऊ शकता).
किंचीतसे मीठ, पाव चमचा जायफळ पूड आणी वेलची पूड, तळण्यासाठी तेल. २ टिस्पून तूप.
कृती-
पराती मध्ये थोडेसे पाणी घालून बारीक मिक्सर केलेला नारळाचा कीस घालून घ्या.त्यामध्ये बारीक केलेला गूळ घ्यावा.
हदय-विकाराच्या झटक्याने मंत्री लोहिया यांचे रुग्णालयात निधन.
वृत्तपत्र खाली ठेवून मी चहाचा कप हातात घेतला. "माणूस आणि मंत्री म्हणून दोन्ही बाबतीत ते वाईटच होते. पण त्यांना माझ्या हाताने मरण आले नाही. हे माझ्यावर त्या परमेश्वरालचे फार उपकार आहेत. एखाद्याच्या मृत्यूस आपण जबाबदार असने हे फार वाईट. फार म्हणजे फारच वाईट. अपराधीपणाची भावना जगू देत नाही आणि पोलिस शोधात पकडले गेले तर जन्मठेपेची शिक्षा. यापासून कोणी ही वाचवू शकत नाही."
०००
हिरवाई चा शालू लेउनी ही धरा उभी आहे स्वागतासाठी. झाडा, फुला-पानांवरती, घरावरती, छपरावरती अन मनावरती येणारी मभळ बाजुला सारुन सैरभैर पळणार्या ढगांचा लपंडाव सुरु झाला आहे. कडक उन्हाचा दाह शमवण्यासाठी कातर वेळेस नभ उतरु लागले आहेत. अशा वेळी रातकिड्यांची किर्र आणि काजव्यांची सोनेरी रांगोळी सळसळणार्या गवताच्या पात्यामध्ये नवलाईचे स्मित घेउन आली आहे. मदनाचे चाप जणू असे ईन्द्रधणू नभी उमटले आहे. चींब भीजूनही चमचमणारे ऊन म्हणजेच नव चैतन्याचा जन्म झाला आहे. कारण ऋतुचे सोहळे घेऊन आता माझा श्रावण आला आहे .
आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरले जातात. प्रत्येक घरी एक विशिष्ट प्रकारचा मसाला वापरात असतोच. कांदा-खोबर मसाला,तिळकुट,गरम मसाला,घाटी पद्धतीचा मसाला, मालवणी मसाला, कोंकणी मसाला वगैरे वगैरे. असे मसाल्याचे खुप प्रकार आहेत आणि त्यांचा वापर ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी केला जातो. पण ऐनवेळी पाहुणे वैगरे आले आणि एखादा मसाला करायचं झालं तर वेळ जास्त लागतो आणि जेवणासाठी उशीर होऊ शकतो.