विणलेली नाती आता कुठे पक्की होतायत..............

गुलाम

Submitted by मिरिंडा on 4 March, 2019 - 06:47

विणलेली नाती
आता कुठे पक्की होतायत,
सैल होण्याची त्यांची धडपड
अजूनही जुन्या खिडक्या खांबांनी बांधली जात्ये

घट्ट जुन्या विणीचं त्यांना कौतुक आहे,
चिवटपणाचा त्यांना अभिमान आहे

अधले मधले लोंबणारे धागे जणू
स्वतंत्रतेचा केविलवाणा झेंडा फडकवतायत,
तरी त्यांना एकूणच घट्ट विणीतून जावेसे वाटत नाही.

स्वतंत्र जाळे विणण्याचे त्यांना धैर्य नाही,
कितीही कुजले, कितीही घाण मारली
तरी त्यांना अजून धीर होत नाही
खरोखरीच बाजूला होण्याचा
स्वतःचा श्वास स्वतः घेण्याची
त्यांना भिती वाट्त्ये.

Subscribe to RSS - विणलेली नाती आता कुठे पक्की होतायत..............