मंद प्रकाशी

मंद प्रकाशी

Submitted by शिवाजी उमाजी on 21 February, 2019 - 07:38

मंद प्रकाशी

त्या चंद्र सावली डोहासाठी
व्याकूळ,वेडी,विरही धरती,
स्वैर सभोवती पोकळ नभी
शोधात फिरे एकाकी अंती !

मिलन म्हणू की विरहवेणा?
उगवता न् एक अस्ता जाती,
युगे युगे का प्रहर टिकवितो
अर्धशृंगारीक ती धूसर नाती?

निळ्या जळात सावळ अंबर
मिळून एकत्र अलिप्त राहती,
स्पर्श वाऱ्याचे ते झुळझुळते
अंतरे का मग स्वयें मोजती?

धुके धरता ओटीत बाळसे
झरते पान्हे कशात विरती?
ओलसर गोंडस रूप घेता
इंद्रधनू प्रकटण्या आतुरती !

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मंद प्रकाशी