भेगाळल्या हृदयाचे गाणे

भेगाळल्या हृदयाचे गाणे

Submitted by Asu on 30 January, 2019 - 22:12

भेगाळल्या हृदयाचे गाणे

अव्यक्त भावनांचे
शब्दही तुझेच होते
ओठावर येऊन बसले
ते ओठही माझे नव्हते

गायले तुझेच गीत
मनात ठेऊन प्रीत
म्हणून काय झाली
ही वागण्याची रीत !

भेगाळल्या हृदयाला
नकोच सांधू आता
मी शोधिन कशातरी
जगण्याच्या अन्य वाटा

आनंदे गात गाणी
होतो भ्रमात सजणी
नव्हते माहित मजला
गात होतो मी विराणी

आता न शब्द जीवनी
गाईन कुणा दुजाचे
शब्द सूर लय ताल
असतील फक्त माझे

Subscribe to RSS - भेगाळल्या हृदयाचे गाणे