डोंगराच्या पल्याड माझ्या बा च झोपटं !!!

डोंगराच्या पल्याड माझ्या बा च झोपटं !!!!

Submitted by मण - मानसी on 25 January, 2019 - 07:56

डोंगराच्या पल्याड माझ्या बा च झोपटं ,
जीवनाच्या अंधारात त्याच मायेचं खोपटं !!
रुणुझुणु बैलासंग तिथे होते हो पहाट,
चालू होते मंग कष्टाचीच रहाट,
गाई - म्हशी बैलासंग बा राबतो जमिनीत,
काट्या कुट्यातच त्याच्या आयुष्याची वाट,
बा खातो भाकरी , लेवतो धोतर,
साधीच राहणी पण उच्च ते विचार,
बा पेरतो हो माया, हात करून राकट,
घालतो हा जगासाठी अन्न धान्याची समेट,
डोंगराच्या पल्याड माझ्या बा च झोपटं ,
जीवनाच्या अंधारात त्याच मायेचं खोपटं !!१!!
बा राबतो शेतात , माय सांभाळते घर,
किती शोभून दिसतं तिचं रांगोळीच दार,

Subscribe to RSS - डोंगराच्या पल्याड माझ्या बा च झोपटं !!!