क्षणात गवसले काही

क्षणात गवसले काही

Submitted by Asu on 22 January, 2019 - 22:15

क्षणात गवसले काही

तू नजर उचललीस फक्त
मी शब्दही बोललो नाही
नजरेला नजर भिडताच
एका क्षणात गवसले काही

आयुष्य होतेच व्यर्थ
अर्थ जगण्याला नाही
एकमेक मनात मिसळता
एका क्षणात गवसले काही

मृगजळा शोधित फिरलो
वणवण भटकलो पायी
पण मागे वळून बघता
एका क्षणात गवसले काही

मज प्रेमाची भाषा कळता
हातचे सोडून पळण्यापाई
जे हरवलेच जवळून नाही
एका क्षणात गवसले काही

Subscribe to RSS - क्षणात गवसले काही