पुरणाचा घाट

पुरणाचा घाट

Submitted by mrsbarve on 12 January, 2019 - 00:26

माझ्या माहेरी पुरणपोळ्या करणे याला पुरणाचा घाट घालणे असाच वाक्प्रचार होता!कारण घरात लाहान मोठी मिळून पंधरा माणसे!ज्या दिवशी पुरण पोळीचा घाट घातला जाई तेंव्हा आज्जी लीडर असे,तिच्या हाताखाली आई,दोन्ही काकवा नाचत असत! तेंव्हा पुरण यंत्र नव्हते !मला अजुनी आई,आज्जी,आणि दोन्ही काकवा आळीपाळीने पुरण पाट्यावर वाटताना ,अगदी तश्या आठवताहेत.एरवी आज्जी कधी तरीच स्वयपाकात मदत करत असे,ती भरपूर करारी स्वभावाची होती,त्यामुळे सुनांना बर्यापैकी धारेवर धरलेले असे!

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पुरणाचा घाट