गरज आहे...

गरज आहे...

Submitted by शिवाजी उमाजी on 8 January, 2019 - 21:15

गरज आहे...

एकमेकां हात देण्याची
देता हात... उपकारी
निसर्ग वाचवण्याची..!
कारण, प्रगती तर
आपण केलीच आहे
यान सुद्धा मंगळावर
पोहचलं आहे...!
पण, इथे पृथ्वीवर?
सिमेंटची जंगले,
ओसाड शेती,
अन्न, पाण्याची कमतरता,
शोधात ज्याच्या...जनता
फिरत सैरभैर आहे...!
गरज आहे...
अजूनही थोडं सावरायची,
ऐहिक सुखाला आवरायची !
©शिवाजी सांगळे

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गरज आहे...