आधाराचे बोत..बाबासाठी कविता

आधाराचे बोट

Submitted by स्मिता द on 21 December, 2018 - 01:36

आज खूप दिवसांनी का कोण जाणे वडिलांसाठी कविता लिहावीशी वाटली, आणि झरझर ती उमटली ही कागदावर. बघा कितपत जमलीये

आधाराचे बोट..

बालपणी पाऊल पडले
आधारबोट बालमुठी स्थिरावले

अजूनही मुठ तशी अन बोट तसे
डळमळले कधी तर सावरले आधारमुठीने

पडले तरी धैर्य होते पाठी
आधाराचे बोट होते मुठी

पाऊल पडले त्याबरहुकूम
आधाराचे बोट होते मुठभरूनी

कौतुकाने विसावले, आनंदाने मोहरले
दु :खाने शहारले, परी आधाराने सावरले

मन कधी भरून दु :ख गेले सांडून
आवेगात त्या बोटं राहिले धरून

गुणावगुणांचा वारसा मिळाला
आधारबोटाचा ठेवा गवसला

Subscribe to RSS - आधाराचे बोत..बाबासाठी कविता