भटकंती

भटक्यांची दुर्ग पंढरी- किल्ले रायगड

Submitted by संदीप पांगारे on 8 March, 2012 - 05:57

मायबोलिवरिल माझे दुर्गभ्रमण या सदराची पारायणे करताना महाराष्ट्रातील बरेसचे किल्ले फिरलो.

आनंदयात्री,आशुचँप, सेनापती, यो Rocks , जिप्सी, रोहित एक मावळा, दिनेशदा,गिरीविहार, इ इ , अनेकांची वर्णने वाचून प्रतक्ष: फिरल्याचा अनुभव घेतला.

त्याचे असे झाले कि, आमच्या सौ.च्या ऑफिस तर्फे शिवतर घळ दर्शन आणि रायगड दुर्ग दर्शन असा कार्यक्रम होता.

सकाळीच वरंधा घाट मार्गे कूच केले.

भोर मधील महाराजांचा पुतळा

IMG_3937.JPG

विषय: 
शब्दखुणा: 

जलदुर्ग ४ - खांदेरी. उंदेरीच्या जलमुलुखांत.. (भाग १ . उंदेरी)

Submitted by हेम on 2 March, 2012 - 15:31

बर्‍याच वर्षांपूर्वी समीर कर्वेंचा खांदेरी दुर्गावरील मटा मधला लेख आणि फोटो पाहून खांदेरी-उंदेरीसाठी तगमग बराच काळ सुरु होती. तीनेक वर्षांपूर्वी चक्रम हायकर्सच्या विनय आणि आशुतोषने सहसा न होणार्‍या सागरी दुर्गांच्या सफरीचा घाट घातला. खांदेरी- उंदेरी- सुवर्णदुर्ग- पद्मदुर्ग हे ४ दुर्ग तर 'करायचेच' कॅटेगरीत होते. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे परवानगी आणि स्थानिक नावाड्यांशी संपर्क. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं.

शब्दखुणा: 

पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... दिवस दुसरा... श्रीवर्धन ते लाडघर

Submitted by विमुक्त on 28 February, 2012 - 08:49

२२ जानेवारी २०१२

विषय: 

कल्याण दरवाजा

Submitted by इंद्रधनुष्य on 27 February, 2012 - 07:13

थंडीचा जोर ओसरल्याने मुंबई जवळील नाईट ट्रेकच्या मोहिमेचा बेत शिजू लागला. नाशिक रेंज मधिल पट्टा, हरिहर असे एक दिवसाचे ट्रेक करण्याचा मानस होता. पण टांगारुंच्या कृपेने तो फिसकटला. आयत्या वेळी कुठे जायचे हा प्रश्ण भटक्यांना कधीच पडत नाही... एक हाक दिली की सह्याद्रीतून हजारो प्रतिसाद येतात... तो प्रश्ण 'ऑफबिट सह्याद्री'ने सोडवला... महाशिवरात्रीचा मुहुर्त साधून माहुली-भंडारगड मार्गे 'कल्याण दरवाजा' अशी मोहिम ठरली होती... रोमा, गिरी आणि मी त्यात सामिल झालो.

विषय: 
शब्दखुणा: 

पुणे ते गोवा कोकणमार्गे सायकलवर... पहिला दिवस - पुणे ते श्रीवर्धन

Submitted by विमुक्त on 25 February, 2012 - 01:03

जानेवारीतला ३ रा आठवडा उजेडला आणि अजून फक्त ५ दिवसांनी ट्रीप सुरु होणार हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता... पण, नेमकं कधी नाही तर ह्याच आठवड्यात ऑफिसमधे भरपुर कामं आलं... कामाच्या गडबडीत ट्रीपसाठी खुपशी तयारी नाही करता आली, पण एका अर्थी ते बरच झालं कारण... "आपण ट्रेकला कसं खुप प्लान न करता जातो, अगदी तसंच ट्रीपला जावूया... सगंळच जरा फ्लेक्झीबल ठेवूया... मग जास्त मजा येते..." असं यशदीपच म्हणनं होतं...

विषय: 

अचानक भेटलेली कला, कल्पकता, सौंदर्यदृष्टी

Submitted by मामी on 17 February, 2012 - 08:28

आपला रोजचा घर तो ऑफिस आणि परत असा प्रवास असो वा देशापरदेशात नोकरीनिमित्त अथवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून केलेली भटकंती असो, कधी कधी अचानक आपल्याला सुरेखशा जागा भेटतात. नेहमीचीच साधी भिंत कोणी आपल्या सुंदरशा चित्रकलेनं सजवलेली असते, तर कधी कोणाच्या मन लावून बनवलेल्या हस्तकलेनं एखाद्या छोट्याश्या रेस्टॉरंटचा कोपरा चमकून उठतो. आपला जीव हरखून जातो.

तुम्हाला अशी कला कधी भेटलेय? भेटली असेल आणि तुम्ही अशा जागा आपल्या कॅमेर्‍यात उतरवून घेतल्या असतील तर त्या इथे शेअर करा. नसतील तर यापुढे लक्ष ठेऊन असा कारण कल्पनाही नसेल अशा जागी एखादी कलाकृती तुम्हाला नक्की सापडेल.

लोकेशन रे लोकेशन !

Submitted by मनीषा- on 15 February, 2012 - 11:32

लोकेशन रे लोकेशन !
हिंदी सिनेमा मधली गाणी म्हणजे आवडीची गोष्ट एकदम . त्यातून ती ५०-६०-७० च्या दशकातली म्हणजे तर गाणे दहा वेळा बघितले असले तरी नजर जराही हटायला तयार होत नाही .
स्टुडीओच्याबाहेर चित्रण झालेली , काही गाणी बघताना एकदम जाणवले की अरे हे मागे दिसते आहे ते तर आपण पाहिलं आहे . आणि मग सुरु झाला एक वेडगळ छंद , ज्यात गाण्यापेक्षा, हिरो आणि हिरविणीपेक्षा, मागच्या इमारती , बागा वगैरे निरखून बघण्याचा .

अशीच काही नमुने दाखल गाणी तुमच्या साठी . आपल्या ओळखीच्या ऐतिहासिक स्थळा ची एक चक्कर घडवून आणणारी ..

कंबोडियातील 'बान्ते सराई' - एक अपुर्व शिल्पकृती

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कंबोडियातील शहर 'सियाम रिप'पासून २०-२५ कि.मी. अंतरावर 'बान्ते सराई' नावाचे एक मंदिर आहे. लाल रंगाचा दगड ज्याला ईंग्रजीत 'रेड सॅन्डस्टोन' म्हणतात; हा दगड वापरुन हे प्राचीन मंदिर दहाव्या शतकात (सन ९६७) उभारले आहे. असे म्हणतात फक्त स्त्रिच्या नाजूक बोटातूनंच कठिण पाषाणावर इतके नाजूक कोरीव काम घडू शकते! म्हणून ह्या मंदिराचे नाव 'बान्ते सराई' अर्थात 'स्त्रियांचे गाव' असे आहे. ह्या मंदिराचे मुळ नाव 'त्रिभुवनेश्वर' असे आहे कारण मंदिराच्या आतमधे शिवलिंग आहे जे मात्र आता तिथे नाही. त्या शिवलिंगाचा उल्लेख 'त्रिभुवनेश्वर' असा केला जातो. हे मंदिर 'ईश्वरपुर' गावात वसलेले आहे.

रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग २ (अंतिम)

Submitted by आनंदयात्री on 2 February, 2012 - 00:41

रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग १

रतनवाडी! सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याचे तितकेच सुंदर गाव! अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ अप्रतिम पुष्करणी, एकीकडे भंडारदरा धरणाच्या जलाशयाची सोबत तर दुसरीकडे डोंगररांगांचा शेजार!
गावातून दिसणारा रतनगड आणि खुट्टा -

खुट्टा क्लोजअप -

विषय: 

रतनवाडी ते डेहेणे - सफर एका आडवाटेची : भाग १

Submitted by आनंदयात्री on 31 January, 2012 - 23:46

तुम्ही जर मुरलेले भटके असाल, तर शीर्षक वाचताक्षणीच समजायचं ते समजून गेला असाल. आणि नसाल तर, तुम्हाला सांगताना मला विलक्षण आनंद होतोय - ही एक सह्याद्रीमधल्या फारशी प्रसिद्ध नसलेल्या आणि कदाचित म्हणूनच अप्रतिम आडवाटांमधली, भ्रमंती आहे! पार रतनवाडीपासून कात्राबाईला वळसा घालत, आजूबाजूचा अप्रतिम नजारा डोळ्यांत साठवत, कातळ-कपार्‍यांतून चालत, अगदी गुहेरीच्या दारापर्यंत आणि पुढेही थेट कोकणात उतरणारी ही वाट दिवस पूर्ण सार्थकी करते.

तर, त्याचं असं झालं -

विषय: 

Pages

Subscribe to RSS - भटकंती