भटकंती

कोकणसय

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

२००९च्या वर्षांताला पुन्हा एकदा आजोळी जायचंच असं ठरवून, आणि नशीबाने त्यात काहीही अडथळे न येता, बर्‍याच वर्षांनी कोकणात पोहोचलो. गेल्यावर लगेच लक्षात आलं, की, अरे, कोकणही आता खूप बदललं.... बरचसं ओळखीचं खरं, पण थोडंसं अनोळखीही वाटायला लागलं.....

प्रकार: 

तोरणा

Submitted by विमुक्त on 15 January, 2010 - 00:08

मी खूपदा तोरण्यावर गेलोय... तोरण्यावर एकटं भटकायला मला जाम आवडतं... भटकत असताना काढलेल्या फोटों पैकी मला आवडलेले काही निवडक फोटो इथे लावत आहे...

तोरणा

सुंदर देखावा

ह्या फोटोच नामकरण तुम्हीच करा... मला काही सुचत नाहीये...

बिनी दरवाजा... उन्हाळ्यात

विषय: 

कुस्ती "अलंग-मदन"संगे ! भाग १ !

Submitted by Yo.Rocks on 13 January, 2010 - 11:51

नाळीच्या वाटेतुन हरिश्चंद्रगड सर केला तेव्हा वाटले काय खत्री ट्रेक झाला ! पण मला वेध लागले होते "अलंग-मदन" वर जाण्याचे ! सह्याद्री रांगेतला अत्यंत कठीण ट्रेक पैंकी असा हा ट्रेक ! पुन्हा 'ट्रेक मेटस' (केवळ तीन ट्रेकच्या अनुभवाने हा ग्रुप अगदीच आपलासा झालाय !!) ह्या ऑर्कुट ग्रुप बरोबर जाण्याची संधी ! म्हणुन आधीच सुट्टी राखुन ठेवली ! (अशा 'खास' ट्रेकसाठी ऑफिसमधुन 'खास' सुट्टी घेउन ट्रेक करनेका मजा कुछ 'खास' होता है ! अर्थातच कारण ठोकावे लागते ! ) सुन्या(मायबोलीकर्)ला देखील त्वरीत कळवुन वेळ राखुन ठेवण्यास सांगितले.. तोदेखील त्याच्या अजुन एका सहकार्‍याला घेउन लगेच तयार झाला !

राजमाची

Submitted by गिरीविहार on 11 January, 2010 - 12:56

बरयाच दिवसान् पासुन राजमाचीवर पावसाळा सोडुन दुसरया त्रुतुत जायचा विचार होता, पण योग काहि जुळुन येत नव्हता. अचानक आसमन्त ग्रुपचा मेल आला, ९-१० डिसेम्बरला राजमाचीचा बेत आहे. लवकर नावे नोन्दवा. इन्द्राला फोन केला तर त्याचा आधीच रायगडावर जाउन महाराजाना मुजरा करायचा बेत पक्का झाला होता. होना करता अखेर नाव नोन्दविन्याकरता फोन केला तर जागा आधिच भरलेल्या होत्या. वाटले की परत सन्धी हुकली. जरासा नाराज Sad झालो पण मनात म्हट्ल, Better Luck Next time.

विषय: 

दुर्ग आणि ढाकोबा... सह्यकड्याचे पहारेकरी

Submitted by विमुक्त on 9 January, 2010 - 01:21

सह्यकड्याच्या टोकावर बसलो की कोकणातून वाहणाऱ्या वाऱ्याचा स्पर्श सुखावून जातो... नजर जाईल तीथपर्यंत कोकणात डोकावता येतं... एक विरळाच निवांतपणा जाणवतो... मागच्या वेळी ढाकोबाच्या माथ्यावरुन हे सगळं अनुभवलं होतं... ढाकोबाच्या परिसरात एकतरी मुक्कामी ट्रेक करायचा असं तेव्हाच ठरवलं होतं...

२-३ जानेवारीला सुट्टी असल्यामुळे भटकंतीला जायचं पक्क होतं... मी, अजित आणि ऋशी असे तीघेजण होतो... पुणे - जुन्नर - इंगळूण - दुर्ग - ढकोबा - आंबोली - जुन्नर - पुणे असा प्लान ठरला...

विषय: 

चिमुकली हिरकणी

Submitted by डॅफोडिल्स on 7 January, 2010 - 10:00

माझ्या मैत्रीणीची मुलगी अवनी हिच्या ट्रेक चे हे वर्णन तिच्या आईने सांगितलेले.

avani1.JPGहीच ती चिमुकली हिरकणी अवनी आपटे.

Exiting and popular trek ,fort Alang, Madan and Kulang.(Around 5000 ft.--level of kalsubai)
Location--Bhandardara Dam, Egatpuri Region, Near mountain Kalsubai, Sayadri Range, Maharashtra..India
Event Organiser--Serac Club,Pune
Duration-- 3days 4 nights
Age Limit--Above 15 years..
Child Name--Avani Apte (mother --Varsha apte)
Date of Birth-6th nov. 2004

तोरणा (निवी) ते रायगड

Submitted by आनंदयात्री on 1 January, 2010 - 03:53

ही भटकंती महाराष्ट्रातल्या अत्यंत दुर्गम तालुक्यांपैकी एक असणाऱ्या वेल्हा तालुक्यातील आहे आणि मग खडा सह्याद्री उतरून थेट कोकणात शिरायचे आहे. खड्या चढाचे डोंगर, विरळ मनुष्यवस्ती, पायवाटांचा सुळसुळाट - त्यामुळे हमखास वाट चुकण्य़ाची शक्यता, आजुबाजुला (बऱ्यापैकी श्वापदविरहित) जंगल, भरपूर शांतता ह्या गोष्टी म्हणजे कलंदर भटक्यांसाठी पर्वणीच!

विषय: 

तेलबैला : 'क्लायंबिंग- व्हॅली क्रॉसिंग- रॅपलींग'

Submitted by सुन्या आंबोलकर on 31 December, 2009 - 06:05

शनिवारी (२६डिसें) कंपनीच्या अ‍ॅन्युअल पार्टी वरून घरी जाताना रूपेशने (ऑफिसमधला मित्र)विचारले "उद्या तेलबैला 'क्लायंबिंग- व्हॅली क्रॉसिंग- रॅपलींग' आहे, येतोयस ना? माझा लगेच होकार. तिथे सकाळी ७:३०- ८:०० वा पोहचायचे होते..

001 Activity Route.jpg

विषय: 

धाकोबा आणि दुर्ग

Submitted by जीएस on 30 December, 2009 - 06:51

१९ डिसेंबरला, जवळ जवळ वीस वर्षांनी भेटलेल्या आमच्या शाळेच्या, पार्ले टिळकच्या सोबत्यांना घेउन गोरखगडाला गेलो होतो. सह्याद्रीच्या मुख्य रांगेसमोर कोकणात मुरबाडजवळ तुलनेने छोटासा गोरखगड उभा आहे. त्यावर उभे राहून, सह्याद्रीच्या भिंतीचे, एकामागून एक को़कणात सरळ कोसळणार्‍या कड्यांचे दृष्य पहात बसणे हा एक भान हरपायला लावणारा उद्योग आहे.

Pages

Subscribe to RSS - भटकंती