भटकंती

एक चांदणी रात्र

Submitted by किंकर on 28 December, 2012 - 13:54

नुकताच पावसाळा मागे टाकीत वरुण राजाने आपला मुक्काम हलवला होता.इंद्रदेवाने सप्तरंगी कमानी उतरवून त्यास निरोपही दिला होता.थंडीची चाहूल अजून तरी नुसतीच हूल देत होती. आमचा एक ग्रुप भटकंती साठी धकाधकीच्या दैनंदिन जीवनास मागे टाकून थोड्या वेगळ्या वाटेने प्रवासासाठी बाहेर पडला होता. रजा सुट्या आणि प्रवास यांची सांगड घालत तीन दिवसांच्या प्रवासाला बाहेर पडताना निघे निघे पर्यंत दुपार टळून गेली.

विषय: 
शब्दखुणा: 

जायचे होते 'तुंग' पोचलो 'तिकोना'ला !!!

Submitted by MallinathK on 28 December, 2012 - 01:01

सकाळ सकाळी ६.३० ला जाग आल्यावर कंटाळा येण्यासारखं काय असतं? तेही शनिवारी? पण तरी कंटाळा आला.
मग काय, मित्राला फोन करुन विचारले 'जायचे का कुठेतरी ट्रेकला?'
पलीकडुन एकच शब्द ऐकु आला 'चल'. बिच्यार्याला झोपेतुन सुद्धा निट जागे होउ दिले नव्हते. Proud

त्याला ४ वाजता काम असल्याने इथे नको, तिथे नको, हे नाही, ते नाही करत, ३ पर्यंत कसंही करुन परत यायचे ठरवुन जायचे पक्के झाले. आता ३ पर्यंत परत यायचे म्हणुन ठिकाण तैलबैला नको, घनगड नको, तिकोणा मी आधीच केलाय म्हणत म्हणत तुंगला जायचे ठरले.

शब्दखुणा: 

किल्ला ओळखा

Submitted by इंद्रधनुष्य on 26 December, 2012 - 03:44

प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२

डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन

*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)

दक्षिण कोकण दुर्गमोहिम २ - पूर्णगड, भुईसपाट झालेला अंबोळगड आणि प्रमुख आकर्षण विजयदुर्ग

Submitted by आशुचँप on 24 December, 2012 - 13:13

आजच्या भ्रमंतीचे उद्दीष्ट होते किल्ले पूर्णगड, जवळजवळ भुईसपाट झालेला अंबोळगड आणि दक्षिण कोकण भटकंतीचे प्रमुख आकर्षण विजयदुर्ग

=======================================================================
दक्षिण कोकण दुर्गमोहिम - पहिला मान रत्नदुर्गचा
http://www.maayboli.com/node/38736
========================================================================

विषय: 

दखल दुर्गवीरांची.....

Submitted by मी दुर्गवीर on 23 December, 2012 - 12:11

महाराष्ट्र टाईम्स कढून दुर्गवीर ची घेतलेली दखल
दि. २२/१२/२०१२ चा महाराष्ट्र टाईम्स (ठाणे आवृत्ती) च्या ठाणे प्लस पुरवणी मध्ये
दुर्गवीर च्या श्रमदान मोहिमेची विशेष दखल घेण्यात आली आहे..578938_582680281747190_1866808110_n.jpg

विषय: 

डलास - फोर्ट वर्थ मेट्रोप्लेक्स मधे कोणी आहे का ?

Submitted by स्पार्टाकस on 20 December, 2012 - 10:28

डलास - फोर्ट वर्थ मेट्रोप्लेक्स मधे कोणी आहे का ? मी नॉर्थ ड्लास मधे आहे

विषय: 

स्वतःचंच अस्तित्व विसरण्यातली मज्जा ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 20 December, 2012 - 05:32

"ए विशालकाका, कधी रे येणार ? आता कंटाळा आला बसून बसून..."

पार्थने पुन्हा तो प्रश्न विचारला आणि मी पुन्हा तेच उत्तर दिले.

"पोचलोच रे आपण ..., अजुन फ़क्त अर्धा तास?"

तसे सगळेच खुसखुसायला लागले. बिचारा पार्थसुद्धा नाईलाजाने हसायला लागला. गेले दहा दिवस प्रत्येक वेळी त्याच्या ’कधी येणार पुढचे गाव?" या प्रश्नाला मी एकच उत्तर देत होतो...."अजुन अर्धा तास फ़क्त, आलेच!"

पण आज खरोखर दहा किमीवर येवून पोचले होते आमचे गंतव्य स्थान. त्यामुळे जास्तीत जास्त अर्धातास अजुन. पण दैवाने पार्थची परीक्षा घ्यायचे अजुन सोडले नव्हते बहुदा. आमच्या वाहनचालकाने पार्थवर अजुन एक बाँब टाकला.

माझी बाईक भ्रमंती - दक्षिण भारत

Submitted by प्रथम फडणीस on 12 December, 2012 - 13:20

आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची असं बरेच दिवस मनात असावं, पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय यावा, आणि मग अचानक एके दिवशी ती संधी स्वत:हून चालत आपल्या दारी यावी, याहून दुसरा आनंद तो कशात असणार? माझ्या बाबतीत असंच काहीसं घडलं. कित्येक दिवसांपासून बाईकवरुन कुठेतरी लांब भटकायला जायचं मनात होतं, आणि यंदाच्या दिवाळीत अखेरीस ती संधी आली.
मी आणि सोबत अजून ३ riders नी सुट्ट्यांचा फ़ायदा घेऊन एक आठवड्याचा बेत ठरवला, आणि जागा ठरली ती दक्षिण भारतातील कर्नाटकाची किनारपट्टी आणि पश्चिम घाटांमधील काही भाग. Google maps वापरून पक्का plan बनवला, आणि अखेरीस ९ नोव्हेंबरला आम्ही निघालो.

Pages

Subscribe to RSS - भटकंती