भटकंती

देवबाग-धामापूर

Submitted by रंगासेठ on 13 January, 2013 - 09:02

नवीन वर्षाची सुरुवात छानस्या ट्रीपने करावी असा विचार आला असतानाच सौरभच्या देवबाग ट्रीपचे फोटो पाहायला मिळाले. तारकर्लीजवळच्या या ठिकाणाबद्द्ल ऐकलच होतं. त्यामुळे देवबागलाच जायचं ठरलं. गजालीच्या धाग्यावर माहिती मागितल्यावर विवेक देसाई आणि यो-रॉक्स आणि मस्त माहिती आणि संपर्क दिले. Happy जानेवारी च्या पहिल्याच विकांताला दौरा करायचा ठरलं.

शब्दखुणा: 

अलंग - मदन - कुलंग ऑफबीट संगे

Submitted by पवन on 12 January, 2013 - 09:02

4 वर्षा पूर्वी ट्रेक ला सुरुवात केली तेंव्हा बरेच जण विचारायचे AMK केला का ? मी निरुत्तर व्हायचो
पण मी आज अभिमानाने सांगतो मी एकाच ट्रेक मध्ये AMK केला तीन दिवस सह्याद्रीच्या कुशीत AMK चा थरार अनुभवला .
25 ऑक्टोबर ला ऑफ बीट च्या राहुल खोत चा अगदी अचानक फोन आला AMK ला येणार का ?
तब्बल दोन दिवस सुट्टी मिळणे आणि एवढ्या अचानक महाकठीण .
हे दिव्य कसे तरी पार पडले .
को -ओर्डी नेटर म्हणून स्वताला अजमावण्याची पहिलीच संधी होती , तसे ट्रेक बरेच केले अरेंज देखील केले पण एका प्रोफेशनल ग्रुप सोबत

विषय: 

एका अपरिचित किल्ल्याचा शोध::: कोराई अन् अनघाई घाटाचा टेहेळणी नाका – ‘दुर्ग अनघाई’

Submitted by Discoverसह्याद्री on 11 January, 2013 - 11:17

.... कोकणातल्या वर्‍हाड गावी पोहोचलो तर समोर सह्यधारेमागचा कोरीगड-तेलबैला, उत्तरेला नागफणी अन् दक्षिणेला सरसगड असे सारे तालेवार दुर्ग-डोंगर होते. पण, सह्यधारेच्या डोंगरांच्या गराड्यात ‘अनघाई’चा डोंगर लपून गेला होता - नेहेमीप्रमाणेच उपेक्षित. म्हणूनच, आजची खास मोहीम होती, कोणीच ट्रेकर्स कधीच न गेलेल्या ‘अनघाई’ या डोंगराच्या शोधाची. पडताळून पहायचं होतं की, हा एक सामान्य डोंगर आहे, की विस्मृतीच्या आड गेलेला अपरिचित दुर्ग!!!

विषय: 

फोटोग्राफी स्पर्धा

Submitted by ssaurabh2008 on 9 January, 2013 - 20:25

दर आठवड्याला एक वेगळा विषय देऊन त्यावर फोटोग्राफी स्पर्धा घेता येईल का इथे ?
त्यामुळे फोटोग्राफर्सना प्रोत्साहनही मिळेल आणि आपल्यालाही वेगवेगळ्या फोटो पाहता येतील. Happy

ज्येष्ठ सभासदांनी कृपया यावर विचार करावा.

मित्राचा फुकटचा सल्ला आणि माझे मतपरिवर्तन...

Submitted by विशाल कुलकर्णी on 8 January, 2013 - 04:48

'केरळला चाललोय फ़िरायला' हे जेव्हा जाहीर केले तेव्हा एका जवळच्या मित्राकडून नेहमीप्रमाणे एक फ़ुकटचा सल्ला मिळाला. केरळमध्ये जिथे काशी घालणार असशील तिकडे घाल, पण तीन गोष्टी चुकवू नकोस..
१. कन्याकुमारीचा सुर्योदय (या बद्दल इथे माहिती आहेच)
२. कोचीनचा सुर्यास्त
३. कन्याकुमारीचा सुर्यास्त होवून गेल्यावर दिसणारा सनसेट पॉईंटचा समुद्र

मित्राच्या शेतात खिचडी पार्टी. (पिंपळगाव, नांदेड)

Submitted by ssaurabh2008 on 6 January, 2013 - 03:58

काल मित्राच्या शेतामध्ये खिचडी पार्टी केली. Happy
त्यादरम्यान काढलेल्या काही फोटो.

१)

२)

३)

४)

येलो स्टोनला मे १३ च्या पहिल्या वा २र्‍या आठवड्यात भेट

Submitted by रेव्यु on 5 January, 2013 - 12:40

मी व पत्नी मे १३ च्या पहिल्या वा दुसर्‍या आठवड्यात अमेरिकेतील येलोस्टोनला जायचे म्हणतोय. आम्ही सॅन फ्रँसिस्कोहून विमानाने जायचे म्हणतोय. सगळं पहायचा बेत आहे. कुणी गाईड करू शकाल का? रु. १५०००० चे बजेट आहे (पण एवढा पैसा कष्टाने जमवलेला आहे - व नीट खर्च व्हावा अशी इच्छा आहे). सॅन फ्रँसिस्कोहून सॉल्ट लेक सिटी पर्यंत विमानाने जायचे म्हणतोय. दुसरा काही स्वस्त पर्याय ( ट्रेन वगैरे) आहे का?
कुणी मार्गदर्शन कराल का?

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

हडसर - निमगिरी

Submitted by इंद्रधनुष्य on 3 January, 2013 - 02:27

दिवाळी आधी रतनगड ट्रेक पार पडलेल्याला दिड-दोन महिन्याचा काळ लोटला होता. दिवाळी नंतर रोमाने भैरवगड तर योने सुधागड सर केला होता. मी ऐन वेळी 'कारणे दाखवा नोटिस' बजावून त्यातून काढता पाय घेतला होता. दोन महिने माझा ट्रेक उपास घडलेला असतानाच नाताळच्या लंब विकांतातील क्रॉसकंट्री ट्रेक रद्द झालेल्या यो आणि रोमाचा फोन आला. क्रॉस नाहितर नाही... निदान कंट्री ट्रेक तरी करुचा धोशा लावला होता. मंगळवार असल्याने एका दिवसाचा ट्रेक करायचा होता. जवळचा प्रबळगड करुया अशी टूम निघाली. त्याच काळात आमचा ट्रेक सवंगडी गिरिविहार फॅमिली सोबत जंगलात 'सफर' करत होता.

गोष्ट माकडाची !

Submitted by Yo.Rocks on 2 January, 2013 - 14:18

समोर 'हडसर' किल्ल्याच्या अप्रतिम पायर्‍या बघण्यात दंग झालो होतो.. किल्लेबांधणीचे एक अप्रतिम उदाहरण समोर होते.. एकसंध पाषाण फोडून केलेल्या पायर्‍या अगदी छप्परवजा बोगदयासदृश मार्गातून जाताना वाटत होत्या.. त्याचेच फोटो घेत असताना पोटात भूकेची चळवळ सुरु झाली.. आता नाश्ता बनवायला हवा म्हणून एकीकडे 'डबा ऐसपैस' खेळायला गेलेल्यांची (मायबोलीकर इंद्रा व रोहीत एक मावळा आणि रोहीतचा मित्र) आठवण झाली.. आम्ही (मी व सौ. रॉक्स) दोन डोंगराच्या घळीमध्ये होतो.. अगदीच अरुंद नव्हती.. इथेच आम्ही सोबत आणलेले सॅकसामान ठेवले होते..

विषय: 

स्वागत २०१३ - सुधागडच्या माथ्यावरून...

Submitted by आनंदयात्री on 2 January, 2013 - 00:44

२०१३ चा पहिला सूर्योदय सुधागडवरून पाहिला. हवामान ढगाळ असल्यामुळे सूर्यरावांनी पहिल्याच दिवशी 'लेटमार्क' नोंदवला. घनगड डोंगररांगेच्या पाठीमागून या सूर्योदयाची काही प्रकाशचित्रे -



Pages

Subscribe to RSS - भटकंती