कयास

कयास

Submitted by शिवाजी उमाजी on 14 December, 2018 - 01:15

कयास

व्यर्थच येथला हा...सारा कयास होता?
भोगातल्या सुखाला तेव्हाच त्रास होता

लाडात वाढणाऱ्या..कायेस मात्र तेव्हा
सौंदर्य लाभ होवो..याचाच ध्यास होता

जीवास घोर आता..सोपा कसा ठरावा
वाढीतल्या वयाला..अंतीम ऱ्हास होता

फांद्या हलून जाता कंठास प्राण आला
अंधार सावल्यांचा..थोडाच भास होता 

चोरांस मान मोठा....सोने इनाम त्यांना
ईमान राखणाऱ्या....मानेस फास होता

पायी विनम्र होता....तो लागलीच गेला
संन्यास घेतलेला.......तो देवदास होता

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कयास