गाज

गाज

Submitted by शिवाजी उमाजी on 2 December, 2018 - 21:38

गाज

विझू लागला भानु, अंधारली सांज
पांगल्या सावल्या, घेत चांदण साज

ओहोटी सागरा, ठसे वाळूवरी मागे
घुमू लागली कानी, निरोपाची गाज

वाहतो हळू पवन, सावळ्याची धून
कानाशी गुंजते, तीची सुमधुर गुज

कोमेजल्या कळ्या, ताटात राऊळी
निजली रानफुले, फांदी करुन शेज

उतरली पारावर, पानगळ झाडांची
विश्रांती घेतात, काही मातीत निज

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गाज