स्पर्शाची किमया

स्पर्शाची किमया

Submitted by Asu on 29 November, 2018 - 22:27

स्पर्शाची किमया

स्पर्शाची किमया होता
काया माझी सळसळली
रोम रोमात फुलला काटा
छाती माझी धडधडली

दिवसाची रात्र होता
फुललं पुनवेचं चांदणं
अंगाअंगावर झालं
गर्द गुलाबी गोंदण

झाला बेभान सागर
आलं भरतीचं उधाण
टाकी लाटांचे उसासे
असं उतावीळ माजणं

देही प्रणयाचा अंगार
पेटे कणाकणात क्षणात
देह अर्पिला माझा
मी माझ्याच देहात

तप्त सूर्याचा गोळा
झाला मिलनी निवांत
सूर्य सागरी डुंबता
पृथ्वी रतिक्लांत शांत

Subscribe to RSS - स्पर्शाची किमया