झोप जेमतेमच लागली. ......................

चिरुमाला (भाग १५)

Submitted by मिरिंडा on 5 November, 2018 - 06:18

झोप जेमतेमच लागली. हळू हळू गाल चांगलाच सुजला. उद्या डॉक्टरांकडे जावं लागेल . त्यांना काय सांगायचं. प्रश्नच होता. सध्या त्यावर विचार न करता मी झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. अर्धवट लागलेल्या झोपेत मध्येच पुढचा दरवाज्या कोणीतरी वाजवित असल्याचा भास झाला. मी खडबडून जागा झालो. खरोखरीच कोणीतरी दरवाज्या वाजवीत होतं. मी वेळ पाहिली " सव्वातीन. ......... यावेळेला कोण आलं असेल . असा विचार करीत मी दरवाज्याजवळ गेलो. गोळेची बायको तर नाही आली ? . दरवाज्या पुन्हा वाजला. आता मी तो उघडण्या ऐवजी , पुन्हा बेडरूममध्ये आलो. तिथली खिडकी हळूच उघडली . हेतू हा की तिथून मुख्य दरवाज्या दिसेल.

Subscribe to RSS - झोप जेमतेमच लागली. ......................