जेष्ठ नागरिक

जेष्ठ नागरिक

Submitted by Asu on 1 October, 2018 - 03:34

आज दि.१.१०.२०१८ च्या जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त -

जेष्ठ नागरिक

जेष्ठ आम्ही नागरिक आम्हा
तरुणांकडून भीक नको
कृतज्ञतेचे भान नसेल तर
तुमचे फुकट दान नको

वेळ नसेल तुम्हाला जर
मनीचे दुःख सांगणार नाही
आयुष्याच्या संकटांपुढे
चार पायांवर रांगणार नाही

टाकाऊतून टिकावू म्हणून
पाळणाघर आमचे करू नका
अडगळीचा कचरा म्हणून
घर आमचे हरू नका

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जेष्ठ नागरिक