सूरबावरी राधा

सूरबावरी राधा

Submitted by Asu on 26 September, 2018 - 23:11

सूरबावरी राधा

अलवार भावनांचे
नकोच गीत गाऊ
सूर तरंग येता कानी
कुठे शोधण्या जाऊ

मिटताच डोळे एकांती
तव रूपाची होई भ्रांती
उघडताच क्षणी परंतु
सर्वत्र केवळ शांती

वारा हळुवार कानी
तव निरोप मजला देतो
अस्तित्व अन् माझे
हिरावून संगे नेतो

सूर बासरीचे शोधित
फिरते रे पुन्हा पुन्हा
लपलास कुठे सजणा
मज सांग ना रे कान्हा

प्रेमाची मी भुकेली
राधा तूझी मुकुंदा
मज दर्शन दे एकदा
ऋणी राहीन रे सर्वदा

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सूरबावरी राधा