देव पळाले

देव पळाले

Submitted by Asu on 23 September, 2018 - 03:20

देव पळाले

मंडपाच्या भव्य मखरी
चिंतामणी चिंता करी -
तीच रोजची अर्चा पूजा
वाटे मज दीर्घ सजा

नैवेद्यही तोच तोच
कसा करावा वाटे भोज !
पुजारी तो कसा सोवळा,
दक्षिणेवरती त्याचा डोळा

टिळा लावुनि दलाल माझा
मावा खातो रोज ताजा
भक्तजनही ना साधा भोळा,
आवळा देऊन मागतो कोहळा

भक्ति भाव ना दिसे कुठे
सारे लुटण्या पुढे पुढे
देव मांडिला बाजारी
लाज ना लज्जा आचारी

देवाचे मग अवसान गळाले
मंडप सोडून देव पळाले
पळता पळता पाऊल अडले
दीना घरी जाऊन रडले

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - देव पळाले