हितगुज ग्रूप

तडका - ऐक बाई

Submitted by vishal maske on 26 January, 2016 - 20:35

ऐक बाई

अपायी रूढींचं खुळ सारं
झटक्या सरशी काढ गं
विषमतेच्या भींती सार्‍या
आता मनातुन पाड गं

तुला संविधानानं हक्क दिला
आता चार-चौघात बोलावं तु
प्रगतीची तुच धमनी आहेस
जगाच्या ओघात चालावं तु

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - २६ जानेवारी

Submitted by vishal maske on 26 January, 2016 - 09:23

२६ जानेवारी

न्याय आहे, हक्क आहेत
आहे एकात्मता अन् समता
भेटला आश्रय संविधानिक
जगण्यात आली निर्भयता

राज्य पध्दती या देशाची
ठरलीय जगात भारी
प्रजासत्ताक या राज्याची
साक्ष देते २६ जानेवारी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आदर्श राष्ट्र

Submitted by vishal maske on 25 January, 2016 - 23:23

आदर्श राष्ट्र

अभिमानाने,स्वाभिमानाने
फडकतो हा तिरंगा हो
आपली राष्ट्रीय एकात्मता
जोमा-जोमाने सांगा हो

संविधान गौरव दिन हा
ना मनात मावती हर्ष हे
राष्ट्र हे आहे प्रजासत्ताक
जगात ठरले आदर्श हे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - संविधानाच्या आश्रयाने

Submitted by vishal maske on 25 January, 2016 - 20:39

संविधानाच्या आश्रयाने

संविधान हे या देशाच्या
स्वातंत्र्याची हो शान
होत राहील गौरव सदा
याचे गातोया गुनगाण

दिधली सत्ता प्रजे हाती
वाढला आमचा रूबाब
संविधानाच्या आश्रयाने
ही प्रजा रहाते सुखात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

१०० स्मार्ट सिटी आव्हाने की स्मार्ट नेत्यांची कसोटी

Submitted by नितीनचंद्र on 22 January, 2016 - 05:44

कालच म्हणजे २१/१/२०१६ ला चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात स्मार्ट सिटी आव्हाने या विषयावर रोटरी क्लब आयोजीत शिशीर व्याखानमाला यात एक परिसंवाद झाला.

आज काल प्रचार नाही तर सर्व व्यर्थ या तत्वावर मोठे वक्ते येऊनही रामकृष्ण मोरे सभागृह अर्धे भरेल इतकी गर्दी दिसली नाही. जे कोणी होते ते सर्व निवृत्त आणि वेळ घालवायचे साधन म्हणुन आलेले. तरुणाई मोजकीच दिसत होती.

शब्दखुणा: 

सर्वांत मोठ्या लोकशाही प्रजासत्ताकाचा सोहळा, २६ जानेवारी

Submitted by पराग१२२६३ on 22 January, 2016 - 00:27

बर्‍याच काळापासून होणार होणार म्हणत असलेले बोरिवलीत गटग

Submitted by वेल on 17 January, 2016 - 08:36
तारीख/वेळ: 
26 January, 2016 - 07:13 to 10:07
ठिकाण/पत्ता: 
बोरिवली स्टेशन जवळचे राधाकृष्ण हॉटेल, डायमंड टॉकिज आणि गोयल शॉपिंग सेंटरच्या डायगोनली ऑपझिट

विरारपासून मीरा रोड, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव पासून पुढची मुंबई,
मुलुंड ठाणे पासून कल्याण बदलापूर इथपर्यंतच्या आणि अगदी कुलाब्यापर्यंत कुठेही राहणार्‍या
अगदी मुंबई बाहेरही कुठेही राहणार्‍या माबोकरांनी आवर्जून यावे. आपले मायबोलीचेच गटग आहे.

कोणकोण येउ शकेल ह्याची कृपया इथे नोंद करावी ही विनंती. आपण बारा पंधरा लोक असू तर राधाकृष्णची पार्टी रूम आपल्याला (ऑलमोस्ट) एक्स्लुसिव्हली वापरता येईल. दंगा करता येईल. पण आधी समजले पाहिजे तर तिथे सांगून ठेवता येईल.

माहितीचा स्रोत: 
:)
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

उत्तर कोरियाचा अणुतिढा

Submitted by पराग१२२६३ on 17 January, 2016 - 01:18

हॅलो, सोबत मी माझा लेख पाठविलेला आहे. उत्तर कोरियाच्या अणुचाचणीच्या पार्श्वभूमीवर माझा हा लेख दैनिक सामनामध्ये (दि. १७/१/१६) प्रकाशित झाला आहे.
---
अणुचाचणीमुळे चिंता
Saturday, January 16th, 2016

तडका - ब्रीद संक्रातीचे

Submitted by vishal maske on 14 January, 2016 - 20:56

ब्रीद संक्रातीचे

मनातील द्वेश
पटकन सोडवा
गुळाचा गोडवा
मनात वाढवा

कपटी पणाचा
विसरून झोला
तिळ-गुळ घ्या
गोड-गोड बोला

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - सणांचे डिजीटायझेशन

Submitted by vishal maske on 14 January, 2016 - 09:45

सणांचे डिजीटायझेशन

मोबाईल टू मोबाईल
घेता येतो-देता येतो
संक्रातीचा तिळ-गूळ
मनभरून पाहता येतो

रिती परंपरा वरतीही
आधुनिकतेचे जाळे आहेत
अन् सण-वारही हल्ली
जणू डिजीटल झाले आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप