हितगुज ग्रूप

भिमरायाचे अनुयायी

Submitted by vishal maske on 14 April, 2016 - 08:19

* महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के "
यांची महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर गाजत असलेली
" भिमजयंती १२५ "निमित्त एक खास रचना

-------* भिमरायाचे अनुयायी *-------

कवी :- विशाल मस्के,सौताडा.
मो. 9730573783

फक्त घोषणा देणारे नाही
आत्मसात करणारे आहेत
वेळ प्रसंग लक्षात घेऊन
नसात वादळ भरणारे आहेत

इतिहासाला साक्ष ठेऊन
भविष्याचे आहेत निर्माणकर्ते
करताहेत हे कार्य असे
पाहूनी यांना छाती स्फूरते

कुठे नरम,कुठे गरम तर
कुठे सारेच भन्नाट आहेत
हवे तिथे होतात लीन अन्
हवे तिथे ते ऊर्माट आहेत

अन्यायाचा प्रतिकार अन्

शब्दपुष्पांजली: सारं काही राज्यांसाठी...

Submitted by घारुआण्णा on 5 March, 2016 - 06:54

गडांचा राजा रा्ज राजेश्वर रायगड...
कितीही वर्णनं करा,कौतुक करा अपुरीच पडणारा माझ्या राजाची किर्ती दिगंतात करणारा रायगड..
r4 .jpg
गडकोटं पाहाणं हा खरतर मराठी मातीत रुजलेला पुर्वपार छंद आहे... अगदी फारसा इतिहासात न रमणार देखील महाराष्ट्राबाहेर किल्ला पहायला गेला तर लगेच महाराष्ट्रातल्या किल्ल्याचं कौतुक आणि तुलना करत राहातो...प्रत्येक किल्ला वेगळा आणि त्याहुन त्या कडे पहाणारे, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या प्रमाणे..

Fancy dress sathi idea havi aahe

Submitted by saare_ga_ma_pa on 25 February, 2016 - 07:29

शाळेत Fancy Dress आहे तरि कहि सुचवा.
काही तरी नवीन वेगळे करायचे आहे.
थीम कही दिलेली नही आहे.
मोठ्या गटात आहे.

प्रांत/गाव: 

युनायटेड थ्रू ओशन्स...

Submitted by पराग१२२६३ on 2 February, 2016 - 11:51

s2016020676790.jpgजहाजांचा संगम

अहोय, हॅलो, नमस्ते म्हणत भारतीय नौदलाने विशाखापट्टणम येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ताफा निरीक्षणासाठी जगभरातून आलेल्या सर्वांचे स्वागत - शुभंकर डॉल्फीन

रे साजना,...

Submitted by vishal maske on 2 February, 2016 - 09:13

रे साजना,...

कवी :- विशाल मस्के
मो. :- 9730573783

ना येती ओठांवरती
या विरहाच्या वेदना
तुझ्यापरी स्नेहाच्या
दाटल्या रे भावना

शृंगार सारा चढवूनी
तुझविनं हा साज ना
प्रतिक्षा रे तुझीच ही
तुच माझा साजना

ये सख्या तु परतुनी रे
ना मन माझे हे स्वार्थी
गाते रे गुणगाण तुझे
तुझीच ही रे आरती

ओळखते मी जाणते रे
ती तुझ्या मनातील प्रीती
तरीही तु का दूर साजना
हा विलंब नको रे अती

ही आर्त हाक प्राणांतली
देईल तुजला मी खुशी
सल रूसव्या-फूगव्यांची
मनी नको बाळगु अशी

नको दाखवू विरह हा
प्रेमात तुझ्या हसतानी
बघ दिवानी झाली रे
मी तुझीच रे मस्तानी

तडका - शिक्षक विना-अनुदानित

Submitted by vishal maske on 1 February, 2016 - 07:28

शिक्षक विना-अनुदानित

कर्तव्यात कसुर नाही
कर्तव्य चोख आहेत
सपोर्टचीही कमी नाही
पाठी त्यांच्या लोक आहेत

झटताहेत शिक्षक सारे
स्व-प्रश्न बाजुला ठेऊन
घडवताहेत भविष्य ते
विना-अनुदानित राहून

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आपली ओळख

Submitted by vishal maske on 30 January, 2016 - 22:06

आपली ओळख

कुणी सांगायची गरज नाही
माणूस मनालाच खाऊ लागला
अन् स्वधर्म सांगण्यासाठी
आता अनुपमही भिऊ लागला

पण जाती धर्मा विषयीचा
ऊगीचंच हा काळोख आहे
जाती-धर्म हवेच कशाला
भारतीय आपली ओळख आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अती आनंद धोक्याचा

Submitted by vishal maske on 28 January, 2016 - 20:56

अती आनंद धोक्याचा

हतबल होऊन रडण्यापेक्षा
ठाम राहून लढत रहावं
दु:खे झूकतील पायापाशी
सुखाची वाट चढत रहावं

पण दु:ख सरलं बाजु म्हणून
ऊत-मातपणा करू नये
अति आनंद धोक्याचा
आपल्याच हातुन ठरू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - स्वाभिमान लिकेज

Submitted by vishal maske on 27 January, 2016 - 21:30

स्वाभिमान लिकेज

हूड्यासाठी झाला गुंडा
समाज आमचा जरा
येईल कधी सांगा इकडे
तो विवेकवादी वारा

मुर्दाड झाले ह्रदय त्यांचे
बेईमानी आहे श्वासा-श्वासात
स्वाभिमानही संपले त्यांचे
लिकेज आहेत नसा-नसात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - राष्ट्रीय पीडा

Submitted by vishal maske on 27 January, 2016 - 10:58

राष्ट्रीय पीडा

तुमचा झाकू आम्ही
आमचा झाका तुम्ही
असे भ्रष्टाचारी सुत्र
इथे चालते हो सर्वत्र

नेटवर्क घोटाळेबाजांचे
न सुटता तीडा आहे
हा वाढता भ्रष्टाचार
हो,राष्ट्रीय पीडा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - हितगुज ग्रूप