कविता माझी सोनपरी

कविता माझी सोनपरी

Submitted by Asu on 10 September, 2018 - 13:07

कविता माझी सोनपरी

सुवर्णफुले उधळीत आली
आनंदाची खैरात झाली
पणत्या लावा दारोदारी
स्वर्गातून आली सोनपरी

संसाराच्या वेली फुलली
मोगरकळी घरी उमलली
सुगंध उधळीत घरीदारी
स्वर्गातून आली सोनपरी

मंगल मंगल झाले सारे
वदती सर्वां गंधित वारे
आनंद विहरतो खरोखरी
स्वर्गातून आली सोनपरी

नाचू किती गावू किती
वेड लागेल वाटे भीती
भाग्यवान मी या भूवरी
स्वर्गातून आली सोनपरी

पणती आज घरा पेटली
उजळेल उद्या धरा सगळी
धन्य देवा कृपा मजवरी
स्वर्गातून आली सोनपरी

Subscribe to RSS - कविता माझी सोनपरी