गोपिका भक्ती

गोपिका भक्ती

Submitted by Asu on 2 September, 2018 - 01:36

गोपिका भक्ती

घट अजुनि ना पुरते भरले
का छळिशी आम्हा कान्हा
सूर बासरीचे ऐकल्याविना
गाईही ना सोडती पान्हा

नको वाजवू तुझी बासरी
ओढ लाविते तना मना
घरदार, संसार सोडुनि
पाय ओढती कुंजवना

दही दुधाचे माठ फोडुनि
प्रेमरसाने न्हाऊ घालिशी
कधी अचानक पाठी येऊनि
संकटकाळी गाठ सोडिशी

नंदकिशोरा, माखनचोरा
काय हवे तुज चोरून घे
गोपिका आम्ही कुलीन नारी
होईल बदनामी घरी जाऊ दे

भक्ती वाहिली तुझ्याच पायी
नाचविशी तू नाच नचैया
मोक्षदा तू कृष्ण कन्हैया
गोपालक तू आम्ही गैया

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गोपिका भक्ती