कथा सुवर्णाची

कथा सुवर्णाची

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2018 - 23:08

आशा कार्यकर्त्यांची सभा आटोपून सुवर्णा गावी परतत होती. मुलीची आणि मुलाची शाळा सुटली असेल आणि दोघे चालत चालत घरी येत असतील ह्याचा तिला अंदाज होता. एस टी मध्ये बसून ती खिडकीतून दिसणारे उजाड बोडके डोंगर बघत स्वतःच्या आयुष्याशी त्यांची तुलना करत होती. हे उजाड बोडके डोंगर आणि टेकड्या तिला खूप काही शिकवायचे. सुवर्णाच्या समाजातील स्थानिक पुढारी, जाणती माणसं, चार शब्द बोलता येणारी माणसं आणि हे डोंगर अगदी सारखे वाटत होते तिला! ह्या डोंगरांवर फक्त तेव्हाच हिरवा रंग चढतो जेव्हा वरून चार थेंब पडतात. तशीच ही जाणती माणसं आणि पुढारी!

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कथा सुवर्णाची