सकाळचा वेळ ..........................

चिरुमाला (भाग १२)

Submitted by मिरिंडा on 16 August, 2018 - 06:52

सकाळचा वेळ तर साफसफाई करण्यात आणि वर्तमानपत्र वाचण्यात गेला. घरात जी काही बिस्किटं, वगैरे होते ती खाल्ली गेली. आत्ता तरी माझ्याकडे कोणीही येणार नव्हतं. म्हणून मी घराला कुलुप घालून पडक्या चर्चकडे मोर्चा वळवला. साधारण दोनतीन मिनिटं चालल्यावर एका बाजूने पडके चर्च समोर आलं. त्याचा प्रार्थना हॉल शिल्लक होता. तिथे असलेले तुटके फुटके बेंचेस तुडवीत मी तेथील व्यासपिठाकडे गेलो. ते साधारन दोन तीन फूट उंच होतं. वर सगळं गवत उगवलेलं होतं. तिथलं भाषणाचं मेज केव्हाच नष्ट झालेलं होतं. हॉलच्या खिडक्या बऱ्याचश्या तुटलेल्या होत्या. ज्या होत्या त्या जेमतेम उभ्या होत्या.

Subscribe to RSS - सकाळचा वेळ ..........................