तिच्यासाठी

Submitted by विवेक मोकळ on 12 August, 2018 - 02:35

त्या पुरुषाच्या धाकात अडकली ती काळजीच्या चौकटीत,उंबरठ्याच्या नादात तिचे अवघे तारुण्य झिजले अंधारात, मला माहीतच नव्हता पुरुष सामर्थ्याचा हा उन्मत्तपणा...त्याच्या या गैरवर्तुणुकीत कित्येक फुललेल्या कळ्या सुकून गेल्या अगदीच आयुष्यातूनच उखडून गेल्या..
मनुष्या तुझा पुरुषार्थ तिनेच तर सांभाळला होतो,तुझ्या प्रत्येक अंधार वाटेवर तीच तर पणती म्हणून तुझ्या पायाखाली जळत होती, शेवटी तूच पेटवले वासनेपोटी

शब्दखुणा: 

उंबरठा व्यथा

Submitted by विवेक मोकळ on 12 August, 2018 - 00:55

शेंदूर फासलेल्या पाषाणावर टेकतो का माथा
जिवंत असलेल्या माणसाला मारतो का लाथा,

भ्रष्टाचाराच्या गोत्यात करतो किती रे कुकर्म
अरे माणसा अमाणुसकीची गातो का गाथा,

स्वार्थीपणाने जातांध स्वैराचार हा किती माजला
अत्याचारी बनून तूच समधर्मी लिहितो का कथा,

हवसेच्या व्यसनात तुझ्यातही होतो शैतान जागा
अरे तिच्या आर्त वेदनेची पुन्हा मांडतो का व्यथा,

स्व बळावर गाठली तिनेही कित्येक उत्तुंग शिखरे
अरे आज उंबरठा न ओलांडण्याची पाडतो का प्रथा...
====================©विवेक मोकळ
#art_by_me

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - #©