अतुल चौधरी

काहूर

Submitted by अतुलअस्मिता on 5 August, 2018 - 01:49

DON'T CRITICIZE WHAT YOU CAN'T UNDERSTAND!

समुद्र खोली आकाश ऊंची,
मोजणार तरी कशी;
श्वास कस्तुरी अदृश्य कुसुमी
ओवणार तरी कशी?

घुंगुरनाद तारकांची किणकिण,
ऐकणार तरी कशी;
कॅनव्हासवरील धूसर चित्रे
रंगवणार तरी कशी?

नेत्रवार हुंकारांची जखम,
वाळणार तरी कशी;
विराट भावप्रतिमा हृदयात
मावणार तरी कशी?

स्वरझंकारी छेडली तार
उमजणार तरी कशी
सूरसशक्त नादप्रवाह
झेलणार तरी कशी

मुकीसुकी हाक कंठी,
मांडणार तरी कशी;
प्रारंभातच शेवट तिथे; कविता-
कळणार तरी कशी?

©अतुल चौधरी.

Subscribe to RSS - अतुल चौधरी