विठ्ठल दर्शन

विठ्ठल दर्शन

Submitted by Asu on 22 July, 2018 - 00:37

विठ्ठल दर्शन

रूप तुझे सुंदर, पाही निरंतर |
रिकामे मंदिर, अंतर्यामी ||

कटीवर तव हात, नाही तू बोलत |
गरीबाची हालत, पाहोनिया ||

काय तुज मागू, नाही तुजपाशी |
राही मी उपाशी, पंढरीशी ||

काय तुज देऊ, नाही मजपाशी |
भक्तीभाव पायी, ठेवियला ||

दगडाच्या देवा, नाही तुझा हेवा |
खाशी तू मेवा, विटेवरी ||

पंढरीशी आलो, तुझ्या दर्शनाला |
नाही तू दिसला, पंढरीला ||

वारकरी गोंधळ, रिकामे देऊळ |
सर्वत्र धावपळ, शोधण्याला ||

घेऊन एकतारी, बैसला भिकारी |
तिथे तुझी स्वारी, विठ्ठला ||

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - विठ्ठल दर्शन