वाटेवर

वाटेवर पंढरीच्या

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 July, 2018 - 09:28

वाटेवर पंढरीच्या

वाटेवर पंढरीच्या नवल म्या देखियले
वारकऱ्याच्या कुडीत संत सारे सामावले

भक्तांसाठी तुकयाने वाणसामान वाटले
ओवी जात्याव जनीची गावखेडे रे जागले
पंगतीला पाण्यासाठी घट गोरोबाचे आले
नाथ वारकऱ्यांसाठी तूप घेउनी धावले
भक्तालागी प्रेमाचे गा भातुकेची भरविले
वाटेवर पंढरीच्या नवल म्या देखियले
वारकऱ्याच्या कुडीत संत सारे सामावले

Subscribe to RSS - वाटेवर