शब्दसृष्टी

माणूस...

Submitted by आदित्य जाधव on 14 July, 2018 - 04:09

माणूस...

मज भेटावया येतो
मज माणूस हा ऐसा,
किती तयाचे कौतुके
व्यर्थ निव्वळ हो पैसा...१

कैक उल्हासी तो गडी
डाव राखुनी ठेवतो,
बोल बोलतो ऐसे की
साद मनाला घालतो...२

दुःख मनातले, त्याची
जागा ती वळचणीला,
त्याचे मोकळे आकाश
स्वैर पक्षी, पाखराला...३

त्याच्या वाटा जोखताना
त्याला ही थोडं जोखावं,
मज माणूस ऐसा की
वाटे नव्याने भेटावं...४

नव्या त्याच्या गाठीभेटी
त्याचे नवे अदमास,
सांगा ! कुणाला मी सांगू
ऐसा माणूस तो खास...५

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - शब्दसृष्टी